Breaking

Chandrashekhar Bawankule : माझ्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा !

Nagpur Guardian Minister’s Office registers a case at Juni Kamthi Police Station : पालकमंत्री कार्यालयाकडून जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nagpur : राजकीय नेत्यांसोबत मतदारसंघातील अनेक लोकांची ओळख असते. नेतेही नावासकट लोकांना ओळखतात. यामध्ये काही लोक नेत्यांच्या नावाचा गैरवापर करतात. असाच एक प्रकार नागपूर – कामठी मार्गावरील एका लॉनमध्ये घडला. येथे तिघा जणांनी चक्क राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी केली. ही बाब जेव्हा बावनकुळे यांना माहिती पडली, तेव्हा त्यांनी त्या तिघांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

या प्रकाराची रितसर तक्रार पालमंत्री कार्यालयाने जुनी कामठी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, ३ ऑगस्ट रोजी मैत्री दिनी नागपूर जिल्ह्यातील कामठी रोडवरील एका लॉनमध्ये काही लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पोलिसांनी परवानगी देताना आखून दिलेल्या अटी व शर्तींंचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले होते.

Chandrashekhar Bawankule : आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्यांना चपराक !

नागपूर निवासी वेदांत छाबरिया, वाडी येथील रितेश चंद्रशेखर भदाडे आणि आकाश बनमाली सालम यांनी पोलिसांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर बावनकुळे यांच्याही लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी बोलून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, म्हणून..!

या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने जुनी कामठी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रारदेखील दाखल केली. त्यानुसार उपरोक्त तीन आरोपींविरुद्ध 293, 221, 223 सहकलम 33(A), (W), (¡¡¡), 1 31, 1 35 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.