NCP chief Sharad Pawar – Devendra Fadnavis’ meeting will benefit farmers : ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होत असतो
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (२७ जुलै) भेट होणार आहे. पवारांच्या राजकीय जीवनातील अनुभवाचा फायदा सरकारलाच होणार आहे. या भेटीत ऊस उत्पादक, दुध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल काही ना काही मार्ग निघेल. या भेटीतून काही प्रश्न सुटतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा भेटी झाल्याच पाहिजे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीसंदर्भात सकारात्मक आशावाद व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना काँग्रेसने बोलावले नाही. त्यांना का बोलावले नाही, हे माहिती नाही. मात्र बबनराव तायवाडे राजकीय संघटनांच्या माध्यमातून मेळावे घेऊन ओबीसीचे काम करत असतात. काँग्रेसला ओबीसींसोबत काहीही देणेघेणे नाही. ओबीसींचा मुळ शत्रू काँग्रेस आहे. काँग्रेसनेच ओबीसींचा सत्यानाश केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.
Ladiki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील मोठा गैरव्यवहार उघड !
आयएएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. साधारणतः ८० टक्के मार्क्स नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आहेत. मात्र ज्यांनी २०-३० वर्षे प्रशासनात नोकरी केली आहे. त्यांना २० गुण देऊन त्यांनाही काही आयएएसच्या जागा मिळाल्या पाहिजे, असा प्रयत्न आहे. महसूल विभागाकडून आम्ही १२ राज्य सेवेच्या अधिकाऱ्यांना आयएएसचा दर्जा मिळवून दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नायब तहसीलदार ते तहसीलदार, तहसीलदार ते प्रांत अधिकारी असे प्रमोशन करताना आम्ही काही जागा जुन्या अधिकाऱ्यांना, तर काही जागा थेट भरतीच्या अधिकाऱ्यांना देणार आहो, असेही ते म्हणाले.