Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, कामात दिरंगाई, तर होईल कारवाई!

Orders to speed up the work of the Gamerent center in Koradi : कोराडीतील गामरेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे आदेश

Nagpur कोराडीत महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत (माविम)अंतर्गत वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती, प्रदूषणविरहित कलमकारी आणि वस्त्रप्रक्रिया प्रकल्प तसेच सॅनिटरी नॅपकिन निर्मिती असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. हे प्रकल्प ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या कामांमध्ये दिरंगाई केली तर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

महिलांच्या प्रकल्पांना तसेच गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मंत्रालयातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात मंगळवारी कोराडीतील माविम प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागाचे सहसचिव वी. रा. ठाकूर, महाव्यवस्थापक रवींद्र सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Nagpur Congress : काँग्रेसमधील धुसफुस संपेना, महत्त्वाची बैठक नेत्यांविना

या प्रकल्पांमुळे सुमारे २०० महिलांना रोजगार मिळणार आहे. महिलांसाठीचे प्रकल्प वेगाने पूर्ण करणे माझी प्राथमिकता आहे. या प्रकल्पांद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनवले जाईल. या प्रकल्पांना प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणासाठी महिलांना नियमित सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि त्यासाठीचे विद्यावेतन वेळेत मिळावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

आदिती तटकरे यांनी कोराडी येथील गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या केंद्रात बचत गटातील महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी आणि ठरलेल्या कालमर्यादेत केंद्र कार्यान्वित करावे, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Politics : मंत्रिपदाची दारे बंद, आमदारकीही जाणार ?

यावेळी बावनकुळे यांनी प्रकल्पांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली. प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.