Police Commissioner issues ‘show cause’ notice to Thanedars : पालकमंत्र्यांनी ठणकावल्यानंतर आक्रमक; राजापेठ, गाडगेनगरसह पाच ठाणेदारांवर कारवाईची शक्यता
Amravati राज्यातील महसूल व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पोलिस यंत्रणेची कानउघाडणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी थेट कारवाईचा बडगा उगारत पाच ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री व आयुक्तांच्या नाराजी नंतरही ठाणेप्रमुखांकडून कारवाईबाबत हालचाली होत नसल्याने थेट नोटीसांची कारवाई केली जात आहे. दोन दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना पोलिसांची चांगलीच काम उघडणे केली होती. पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग करतो तरी काय असा सवाल त्यांनी आढावा बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतरही अमरावती जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमधील ठाणेदार निष्क्रिय असल्याचे दिसून आले.
Local Body Elections : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गण रचनेवर १४ हरकती!
राजापेठ, गाडगेनगर, कोतवाली, नागपुरी गेट आणि नांदगाव पेठ या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अलीकडेच गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटने केलेल्या कारवाया सीपींच्या रडारवर आल्या आहेत. स्पाच्या आड चालणारी देहविक्री, फेक वेडिंग पार्टीमधील अल्पवयीनांना मद्यपुरवठा, बनावट दारू विक्री, एमडी ड्रग्ज विक्री आणि ऑनलाइन जुगार अशा विविध प्रकरणांवर गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. मात्र, स्थानिक ठाणेदार आणि त्यांच्या डिटेक्शन ब्रँचला याची कल्पनाही नव्हती.
विशेषत: राजापेठ पोलिस ठाण्याच्या डीबीवर संशयाचे सावट आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकरणात त्यांना विड्रॉल करण्यात आले होते, तरीही स्पाच्या आड देहविक्री सुरूच राहिली. यंदाही २० जुलै रोजी क्राइम युनिटने धाड टाकली, पण राजापेठ डीबीला खबरच नव्हती. त्यामुळे ही मुद्दाम दुर्लक्ष करण्याची भूमिका असल्याचा ठपका खुद्द आयुक्तांनी नोंदवला आहे.
“गेल्या काही दिवसांत गुन्हे शाखेने जेथे अवैध धंद्यावर कारवाई केली, त्या ठाणेदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील,” अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिली आहे.