Protection to the villages adjacent to the tiger reserve project : सुरक्षिततेसाठी निधी कमी पडू देणार नाही, बावनकुळेंचा शब्द
Nagpur जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवनी या परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. ही भीती दूर करण्यासाठी शासनातर्फे तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असा शब्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
एआय AI, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपण, याबाबत प्रशासनातर्फे लवकरच योग्य ती पावले उचलण्यात येतील. शक्य ती कामे लवकर सुरू केली जातील, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांना धीर दिला.
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे वाघाच्या हल्ल्यामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी एक व्यापक बैठक शासनातर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. बैठकीला राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागाच्या प्रधान वनसंरक्षक शोमिता विश्वास, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास राव, प्रवीण चव्हाण, श्रीलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadanvis : केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत!
यावेळी पालकमंत्र्यांनी कोढासावळी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दशरथ धोटे कुटुंबातील सदस्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले. नागपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प व वाघांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन यातील काही वाघ अन्य राज्यांत स्थलांतरीत करण्याबाबत केंद्र सरकारशी विचारविनिमय करून निर्णय घेऊ, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
Pankaja Munde : ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल!
याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वाघाच्या हल्ल्यासह जंगलातील अन्य प्राण्यांकडून जखमी झालेल्या ग्रामस्थांना तत्काळ उपचार मिळावेत, यादृष्टीने पेंच प्रकल्प परिसर अथवा शेजारच्या गावात चांगले उपचार केंद्र साकारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी शासन सकारात्मक असून, लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे या बैठकीत चर्चेअंती निश्चित करण्यात आले.