Protest against the statement regarding farmers : कर्जमाफी आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटल्यावरून संताप
Amravati महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोर्शी येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला ‘नौटंकी’ असे संबोधल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीव्र आंदोलन केले.
या वेळी कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. तसेच मिरच्या जाळून त्या प्रतिकात्मक पोस्टला मिरचीची धूनी दिली आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
‘शेतकऱ्यांच्या वेदनेचा अपमान’ – प्रहार कार्यकर्त्यांचा आरोप
“शेतकऱ्यांच्या वेदनेला ‘नौटंकी’ म्हणणे म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर आहे. बावनकुळे यांचे वक्तव्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचे स्पष्ट दर्शन घडवते,” असा आरोप प्रहार कार्यकर्त्यांनी केला. “जर राजकारणी शेतकऱ्यांच्या वेदनेचा अपमान करतील, तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
Narahari Zirwal : कोकाटे नंतर आता झिरवाळ वादात, अधिकारी आक्रमक,
बच्चू कडू यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टिका
बावनकुळे यांनी मोर्शीत बोलताना काही लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नौटंकी करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी थेट माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घेतले नसले, तरी प्रहार कार्यकर्त्यांनी याला अप्रत्यक्ष टिका मानत तीव्र आक्षेप नोंदवला.
“शेतकऱ्यांचा प्रश्न हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. मात्र भाजप सरकारने या प्रश्नाकडे ‘नौटंकी’ म्हणून पाहत टिंगलटवाळीचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीपूर्वी ‘सातबारा कोरा, कोरा, कोरा’ म्हणणारेच आज कर्जमाफीसंदर्भात तारीख विचारल्यावर त्रस्त होतात आणि आंदोलकांचा अपमान करतात,” असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
Maharashtra politics : वर्चस्वासाठी बेरजेचे डाव, जनतेच्या प्रश्नांचं गूढ मात्र कायमच!
शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी लढा – बंटी रामटेके
या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्यांचा संताप व्यक्त झाला असून, खिल्ली उडवणाऱ्यांचा आणि फसवणूक करणाऱ्यांचा जोरदार निषेध करण्यात आला. “ही लढाई केवळ कर्जमाफीची नाही, तर शेतकऱ्याच्या अस्मितेची आहे,” असे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी स्पष्ट केले.
प्रहारच्या कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी:
शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देणाऱ्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवा
‘सातबारा कोरा’ या घोषणेचा विसर पडलेल्यांना जबाबदार धरा
कर्जमाफी व हमीभावावर स्पष्ट तारीख जाहीर करा