Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने ओबीसींच्या तीन हजार जातींचा अपमान केला !

Rahul Gandhi and Congress insulted three thousand OBC castes : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला

Nagpur : ५० वर्षे सत्तेत असतानाही काँग्रेसने ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. ओबीसींची गणना करण्याची मागणी गेल्या ५० वर्षांपासून होते आहे. संविधानाने एससी, एसटी आणि इतर अशी जनगणना सांगितली होती. पण काँग्रेसने तेही केले नाही. केवळ ओबीसींच्या मतांचा वापर करून घेतला. ओबीसींच्या तीन हजार जाती आहेत. या सर्व जातींचा अपमान काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केला, असा आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

नागपुरात आज (२६ जुलै) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, फक्त जाहीरनाम्यापुरता ओबीसींचा विचार करायचा आणि मग वाऱ्यावर सोडून द्यायचे, हेच काँग्रेसचे धोरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. ओबीसींच्या गणनेची मागणीही पूर्ण केली जात आहे. आता काँग्रेसला ओबीसींची मते घेण्याचा अधिकार नाही. मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेसंदर्भात प्रश्न विचारला असता, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातील सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखांचा आहे, असे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना बजावली ‘शो कॉज’!

उर्वरीत दोन्ही पक्ष काय निर्णय घेतात, हा त्यांचा विषय आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल काही चुकीचा संदेश जाईल. जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दलचे मत खराब होईल, असे वागणे योग्य नाही. यासाठी आम्ही सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे. माझ्यासह मंत्रिमंडळातील सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले.

Chandrashekhar Bawankule : बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्सशिवाय पगार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाबाबत विचारले असता, रोहित पवारांना मिडियामध्ये दिवसभर राहायचं असेल म्हणून फुसकी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फोन टॅप करण्यासाठी खूप फॉर्मलिटीज असतात. सहजच कुणीही कुणाचा फोन टॅप करू शकत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.