Breaking

Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavhan : ‘बावनकुळे सरांसोबत’ रवींद्र चव्हाण राज्याच्या दौऱ्यावर!

47 meetings of BJP across the state in Sanghatan Parv campaign: तीन दिवस महाराष्ट्र पिंजून काढणार; ४७ बैठका घेणार

Nagpur चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे जाणार, असे वाटत होते. पण भाजपने रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी करून बावनकुळेंनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवले. आता बावनकुळे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून ४७ बैठका घेणार आहेत. त्यात रवींद्र चव्हाण पूर्णवेळ त्यांच्यासोबत असतील. त्यामुळे या दरम्यान त्यांना एकप्रकारे ‘बावनकुळे सरांकडून’ प्रदेशाध्यक्षपदाचे प्रशिक्षणच मिळणार आहे.

उत्तर प्रदेशात विविध तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन ऊर्जामंत्री बावनकुळे नव्या दमाने कामाला लागले आहेत. भाजपाच्या ‘संघटन पर्व’ अभियानाच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे १३,१४,१५ फेब्रुवारी असे तीन दिवस महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण या प्रवासात सोबत असणार आहेत. राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत.

FDI Policy : संघ प्रणित मजदूर संघाचा सरकारवर प्रहार!

यावेळी दोघेही राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत. या निमित्ताने चव्हाण यांचा ‘बेस’देखील ते पक्का करणार आहेत.

सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनादेखील कामाला लावण्यात येणार आहे. गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी अकोला येथे हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक. दुपारी ३ नागपूरच्या जगनाडे चौकातील हॉटेल रिजंटा येथे पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ७ वाजता पश्चिम नागपुरात कृष्ण ग्रीन लॉन कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!

शुक्रवारी, १४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नांदेड येथे भक्तिलॉन येथे बैठक घेतील. दुपारी ३ वाजता गुरु लॉन्स अँड फंगशन हॉल, छत्रपती संभाजी नगर येथे बैठक होणार आहे. शनिवार,१५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे बैठक होणार असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता नाशिक येथील लंडन पॅलेस हॉल येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.