Breaking

Chandrashekhar Bawankule : होय..! जयंत पाटलांना माझ्या बंगल्यावर भेटलो, पण..

Revenue minister clarify agenda behind meeting with Jayant Patil : हिवाळी अधिवेशनातील 14 समस्या बैठक लावून सोडवणार

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे. यासंदर्भात मंत्री बावनकुळे यांनी या भेटीची कबुली दिली. ते म्हणाले, या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. तर केवळ विकास कामांबाबत चर्चा झाली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जयंत पाटील काल सांगली त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषयांसंदर्भात भेट घेण्यासाठी आले होते. विखे पाटील त्यांच्या सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्यानं ही भेट झाली. सांगली जिल्ह्याच्या विकास कामांबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांना मी आश्वासन दिले की, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 14 समस्या माझ्या दालनात बैठक लावून सोडवणार आहे.

Chandraahekhar Bawankule: राज्यातील सर्वच जात पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष!

काल संध्याकाळी साडे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान माझ्या अधिकृत बंगल्यावर ही भेट झाली. तेव्हा 400 ते 500 लोक त्या ठिकाणी होते. ही राजकीय भेट नव्हती. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकास कामांची चर्चा झाली. जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता, मला काल रात्री त्या संदर्भातली माहिती मिळाली. काही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पार्टीमध्ये आले होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे तो रिसॉर्ट अनधिकृत आहे. त्या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांना मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

तलाठ्यांच्या असहकार आंदोलनाबाबत ॲग्रीस्टॅगचे काम समन्वयाने करायचे आहे. ॲग्रीस्टॅगमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची माहिती नोंदवली जाऊन त्यांना एक बारकोड मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना ऑनलाईन मिळणार आहेत. ॲग्रीस्टेक कार्डवर संपूर्ण माहिती असणार आहे. हा महत्वाचा उपक्रम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असला तरी हे तलाठ्यांचे काम आहे. त्यांनाच करावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं कार्ड आहे. सर्व योजना त्यातून देता येईल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Project Victims of Amravati : पालकमंत्र्यांनी पुनर्वसित गावांना घ्यावे दत्तक!

अडीच हजार कोटींचा दारू घोटाळा दिल्लीत आप सरकारने केला. कॅगच्या अहवालामध्ये ते आले आहे. चुकीचे परवाने दिले, पैसे गोळा करण्यासाठी केजरीवाल सरकारने हा घोटाळा केला होता. वीस हजार कोटींच्या वर हा घोटाळा होता. अहवालात पहिला घोटाळा समोर आला आहे. पुढील काळात अनेक घोटाळे समोर येतील.

शक्तीपीठ महामार्गाबाद्दल महसूल मंत्री म्हणून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्या दुरुस्त करून सोडवल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग झाला पाहिजे. समृद्धी महामार्ग सारखेच या महामार्गामुळे संपूर्ण चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार सोडवेल. काम होणे महत्त्वाचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.