Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!

 

Scam of Rs 60 lakh through fake attendance book : चौकशी अहवालातून झाले सिद्ध, पोलिसांत तक्रार

Nagpur जिल्ह्यातील नागपूर ग्रामीणमधील बोखारा ग्रामपंचायतीत बनावट हजेरी बुकाच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. नागपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय चौकशी समितीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना सादर केलेल्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले होते.

या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच अब्दुल वाहिद खान यांनी कोराडी पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रात येते. त्यामुळे सरकारदरबारी हा घोटाळा गंभीरतेने घेण्यात येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Crime in Nagpur : बलात्काराचा प्रयत्न; महिलांनी झोडपून काढले

बोखारा ग्रामपंचायतीत २०२३ ते २०२४ या कालावधीन विकासकामांच्या नावावर बनावट हजेरी बुक तयार करून ६० लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत बोखारा येथे कंत्राटदाराला कामाचे अनियमित वाटप, निधी अपहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी अब्दुल वहीद खान यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बोखारा येथील सदस्य पद्मिनी गोठवड, वीणा दिलीप वानखेडे, उज्ज्वल सोनोने, मंगेश अजय बराई, सुखदेव बोंडे, कुंदन ओझा, अश्विनी भलावी, कृष्णा गणेश कुदावळे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी अब्दुल वहीद खान यांनी केली आहे.

Anti Corruption Bureau : महिला सरपंचाला ३६ हजारांची लाच घेताना अटक

केवळ बोखाराच नव्हे तर जिल्ह्यातील आणखी काही ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार होत असून राज्य शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत वर्तुळातून होत आहे. काही ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांऐवजी त्यांचेच कुटुंबीय हाकत असून कमिशनच्या नादात गावांचा विकास रखडला असल्याची ओरड होत आहे.