Breaking

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगलट आला !

Shiv Sena chief Uddhav Thackeray’s inaction backfired on Congress : मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधान भवनातही येत नव्हते

Nagpur : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचा अपमान केला आहे. आता काँग्रेसने विचार करायचा आहे की, त्यांनी आणखी किती अपमानित व्हायचं. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेसला अपमानीत करण्याचं काम आजही होतंय. उद्धव ठाकरेंसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. एकूणच उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगलट आला, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज आजपासून (७ जुलै) सुरू झाले. त्यात सहभागी होण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे मुंबईला रवाना झाले. दरम्यान नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या गटाने जिद्दीने जास्त जागा घेऊन काँग्रेसला कमी जागा दिल्या. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाचा अडीच वर्षाचा तो काळ काँग्रेसच्या अंगावर आला. कारण मुख्यमंत्री त्यावेळी कामच करत नव्हते, विधान भवनातही येत नव्हते. काँग्रेसचे नेते हतबल झाले होते. त्यामुळे काँग्रेसची स्थिती फार वाईट झाली.

Eknath Shinde : शिंदे गटाच्या नेत्याच्या नावाने बेरोजगारांची फसवणूक

शेतकऱ्यांसंदर्भात विचारले असता, पिकांसाठी आवश्यक असलेला पाऊस सध्या पडतो आहे. आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा किंवा उर्वरीत महाराष्ट्रात या पावसाने नुकसान होईल, अशी परिस्थिती नाही. पिकासाठी लागणारा पाऊस योग्य प्रमाणात पडत आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत की, कॅबिनेटमध्ये पहिला विषय पिक आणि पाण्याच्या परिस्थितीचा असला पाहिजे. जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे कुठे नुकसान झाले आहे का, हा पहिला विषय चर्चेला घेतला जातो.

High Court Nagpur Bench : फडणवीस, मुनगंटीवारांसह पाच आमदारांना हायकोर्टाचा दिलासा!

खतांच्या तुटवड्याबाबत प्रश्न विचारला असता, काही बियाणांचा साठा आहे. पण काही लोक कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत. काही ठिकाणी पुरवठा कमी आहे, हे मान्य आहे. पण सरकार हा पुरवठा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.