Breaking

Chandrashekhar Bawankule : प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ !

Stamp duty of Rs 500 for affidavit waived : पालकांचा या प्रमाणपत्रासाठी लागणारा 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार

Mumbai : 2014 ते 2019या कालावधीत ऊर्जामंत्री राहिलेले विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये आजही तीच ऊर्जा आहे, हे ते आपल्या धडाकेबाज निर्णयांवरून सिद्ध करत आहेत. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देणार निर्णय त्यांनी आज (5 मार्च  ) जाहिर केला.

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना विविध प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च करावा लागतोय. याशिवाय त्यासाठी होणारी पायपीट ही त्रासदायक असते. ही कागदपत्रं जमा करता करता पालक आणि त्यांच्या पाल्यांच्या नाकी नऊ येतात. पण महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा हा त्रास वाचणार आहे. शिवाय पैशांचीही बचत होणार आहे.

 

Chandrashekhar Bawankule : दिव्यांगांच्या घरी १५ वर्षे वीज बील येणार नाही!

Chandrashekhar Bawankule : दिव्यांगांच्या घरी १५ वर्षे वीज बील येणार नाही!

जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ माफ करण्यात आले आहे. ही घोषणा आज महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली.

 

Chandrashekhar Bawankule : धापेवाड्यात आलेला विकास निधी गेला कुठे?

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना आजच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार आहे. निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत