Chandrashekhar Bawankule : तुम्ही काय दिवे लावले, हे माहिती आहे !

State Knows What Congress Leader Vijay Wadettiwar Did During His Tenure as OBC Minister : ओबीसी उपसमिती काय करतेय, हे आता राज्याला कळेल

Nagpur : गेल्या १५ दिवसांपूर्वीच ओबीसी कॅबिनेट उपसमितीचा अध्यक्ष झालो आहे. त्यामुळे येवढ्यातच कुणी आरोप करणे सुरू करू नये, थोडी वाट बघावी. ही उपसमिती ओबीसींच्या अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना कसा न्याय देते, हे येत्या काळात कळेल. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी जास्त गडबड करू नये. ही उपसमिती ओबीसींसाठी असलेल्या योजनांचे मॉनिटरींग करणार आहे. त्यानंतर एक-एक करून निकाल राज्यासमोर येतील, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (२१ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ओबीसी मंत्रालय आमच्या सरकारने स्थापन केले. पण त्यानंतर विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री झाले. तेव्हा त्यांनी काय दिवे लावले, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. महाज्योतीमध्ये काय काय भ्रष्टाचार झाले, हेही जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही जास्त गडबड करू नका, जरा धीर धरा. राजकारणाचं जे दुकान तुम्ही मांडलं आहे, ते बंद करा. कारण ही उपसमिती ओबीसी प्रवर्गातील एकाही जातीवर अन्याय होऊ देणार नाही. अन् हिंमत असेल तर समोरासमोर या. मग काँग्रेसने ओबीसींना संविदानिक दर्जा कसा दिला नाही, हे मी तुम्हाला सांगतो. जातनिहाय जनगणना करण्याच्या केवळ वल्गना तुमच्या सरकारने केल्या. पण मोदी सरकारने प्रत्यक्ष जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली, असे बावनकुळे म्हणाले.

Excessive Rainfall Damage : सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार ?

ओबीसींचा विषय हातात घेऊन वडेट्टीवार केवळ राजकारण करत आहे. उलट छगन भुजबळ आणि मी या विषयात अजिबात राजकारण करत नाही आहोत. तर ओबीसींमधील एकाही जातीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आम्ही काम करत आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टिकेबाबत विचारले असता, मोदींवर टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची उंची तपासून घ्यावी, असा सल्ला बावनकुळे यांनी त्यांना दिला.