Chandrashekhar Bawankule : तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणी म्हणणारा तहसीलदार निलंबीत !

Tehsildar suspended for singing songs while sitting on the tehsildar’s chair : माझे नाव वापरून फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Nagpur : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव वापरून क्यू आर कोड पाठवून छत्रपती संभाजी नगरमध्ये एका शेतकऱ्याला भामट्याने कॉल केला. काम करून देण्याचे आश्वासन देत पैशांची मागणी केली. माझ्या नावाने फसवणूक करणाऱ्या त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

यासंदर्भात नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री म्हणाले, फसवणूक करणाऱ्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल. तहसीदारांच्या खुर्चीवर बसून गाणे म्हणाऱ्या तहसीलदाराला आम्ही तात्काळ निलंबित केले आहे. आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मी महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतु जेथे शक्य नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढत करून महायुतीला धक्का बसणार नाही, याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यायची आहे.

Ministers foreign visit : महाराष्ट्र भुकेला असताना मंत्री परदेशात !

पूरपरिस्थितीसंदर्भात बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, त्या त्या ठिकाणी पंचनामे करून एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबारसह अनेक आदिवासी जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या उद्देशाने बांधलेले अनधिकृत चर्च हटवण्याचे निर्देश संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.