The period of accelerating growth from 2014 to 2019 has come again : २०१४ ते २०१९ च्या विकासाची गती वाढवणारा काळ पुन्हा आला आहे
Nagpur : पालकमंत्री सरकार व प्रशासनातील महत्वाचा दुवा आहे. प्रत्येक व्यक्तीचा पालक असतो. त्यामुळे सरकारचा संपूर्ण लाभ, योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी पालकमंत्र्यांची नेमणूक होत असते. पालकमंत्री म्हणजे शोभेची वस्तू नाही, असे स्पष्ट मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
नागपुरात आयोजित मीट द प्रेस मध्ये मंत्री बावनकुळे बोलत होते. आम्ही सगळे बदलवू शकतो, हा आमचा दावा नाही. पण जनतेच्या भावना लक्षात घेवून प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्की करणार आहे. आम्हाला इतके मोठे यश मिळाले की त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या. पण आव्हानही मोठी आहेत.
Wardha forest area : खवले मांजराचे वर्धा येथे होतेय संवर्धन!
जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य देवून पुढील वाटचाल करू, असे सांगून बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. जेथे जेथे कुठे कमी पडू, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. तसे त्यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये सांगितले आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे जनतेने आता निर्धास्त व्हावे.
२०१४ ते २०१९ च्या विकासाची गती वाढवणारा काळ पुन्हा आला आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि मी आता विकासाची गती विस्तारणार आहोत, असा दावा त्यांनी केला. महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये कुठलाही पक्षप्रवेश करताना महायुतीचे नुकसान न होता ती मजबूत कशी होणार, या दृष्टीने पक्षप्रवेश केले जाणार आहेत. एखाद्याच्या प्रवेशाने मात्र महायुती भक्कम आणि मजबूत होत असेल तर त्यासाठी मुभा असणार आहे. मात्र हा निर्णय महायुतीमधील प्रमुख व नेत्यांच्या चर्चेतूनच होईल.
महायुतीविरुद्ध जे निवडणुका लढलेले आहेत. अथवा भाजपामधील ज्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढली आहे. त्यांना पक्षात घेताना संपूर्ण चर्चा करूनच पुन्हा पक्षात घेतले जाणार आहे, अशी सूचना केली आहे. छोट्या स्तरावरचे पक्षप्रवेश करताना मात्र हा विचार नाही. अजित पवारांकडे प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आहे. भाजप आणि शिंदे यांच्याकडे प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आहे. तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसून कुठला पक्षप्रवेश करून महायुती अधिक भक्कम होईल, याचा विचार करतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.