The stand of Congress leaders has consistently been unclear : मराठा आरक्षणाबाबत नेमकी भूमिका स्पष्ट करावी
Nagpur : ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देण्याची भाषा काँग्रेसचे नेते करतात. राहुल गांधी म्हणतात ओबीसी आरक्षण कायम ठेवा, जातीय जनगणना करा. काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली राहिलेली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट करावे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे. पण त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे योग्य होणार नाही. मात्र याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते आज (२८ ऑगस्ट) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
Chandrashekhar Bawankule : गणोशोत्सवानंतरही आंदोलन करता आलं असतं !
२०१४मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही एक भूमिका आहे. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे दोघांचेही म्हणणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासाठी भरपूर काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जातीवरून टीका करणे योग्य नाही. ते अष्टपैलू नेते आहेत. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.
Centers firm stance : राष्ट्रपती – राज्यपालांच्या निर्णयांविरोधात याचिकेचा अधिकार नाही !
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय? नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला का? काँग्रेसने याबाबत ठराव घेतला का, आदी प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना ओबीसी समाजाचे आरक्षण काढायचे आहे का, ते दुसऱ्या समाजाला द्यायचे आहे का की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे. यांपैकी नेमकी कोणती काँग्रेसची भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.








