Breaking

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, म्हणून..!

Uddhav Thackeray wants to take care of the remaining activists : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी जबाबदारीने बोलतात

Nagpur : मतदार यादी चुकली, बोगस मतदान आदी विषयांवर उद्धव ठाकरे सद्यस्थितीत बोलत सुटलेले आहेत. त्यांना असं वाटतं की असं काही बोलल्यास पक्षातील सोडून जाणारे लोक थांबतील. तुटणारा पक्ष सावरण्यासाठी ते असं बोलत असतात. ते त्यांनी खुशाल बोलावं कारण त्यांना उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टिका केली.

नागपुरात आज (४ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्र्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले, संजय राऊत यांना फार गांभीर्याने घ्यायचं नसतं. हिंसाचाराची भाषा ते बोलत आहेत. आम्हीही बघू की त्यांच्यात किती धमक आहे. येथे कायद्याचे राज्य आहे. या महाराष्ट्रात मराठी भाषेच्या विरोधात कुणी बोलत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आता राहिलेला नाही.

Chandrashekhar Bawankule : मी बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही !

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, त्यांचे वक्तव्य मोडून तोडून दाखवण्यात आले. त्यामुळे वाद उद्भवला आहे. मी उद्या (५ ऑगस्ट) त्यांच्याशी बोलणार आहे. एकनाथ शिंदेंबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, शिंदे हे शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते त्यांच्या मतदारसंघात मते मिळवण्यासाठी बोलत असतात.

Uddhav Raj alliance : आम्ही 20 वर्षांनी एकत्र आलो, मग तुम्ही का वाद घालता?

आव्हाड आंनी कितीही भडकाऊ विधाने केली तरी ते आता निवडून येणार नाहीत. हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचे काम त्यांनी करू नये. ते असेच करत राहिल्यास सनातन धर्मही मागे राहणार नाही. काहीही भलते सलते आरोप केल्यास सनातन धर्म चुपचाप बसणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.