Chandrashekhar Bawankule : विरोधात आहेत म्हणून काहीही बडबडतात; वडेट्टीवार ‘इंटरनॅशनल लीडर’, बावनकुळेंचा घणाघात!

 

Vijay Wadettiwar is an international leader : मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टीकेवर महसूल मंत्र्यांचे प्रत्युत्तर

Amravati काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्यांना विरोधात तसं बोलावं लागतं. त्यांच्या बोलण्यात आणि मनात वेगवेगळं आहे. ते इंटरनॅशनल लीडर आहेत. त्यांच्यासोबतच संजय राऊतदेखील Sanjay Raut इंटरनॅशनल लीडर आहेत, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार आणि राऊत यांना जोरदार टोला हाणला.

‘मंगेशकर कुटुंब लुटारुंची टोळी आहे’, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी आज (१० एप्रिल) केले. त्यावर अमरावतीमध्ये पत्रकारांनी विचारले असता, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. विषय पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा असताना वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबावर सडकून टीका केली. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबतही विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले होते. तर मग दाऊदला का आणले नाही, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर वडेट्टीवार यांना विरोधी पक्षातील गटनेता म्हणून बोलावं लागतं. पण अशा विषयांबाबत संवेदनशीलता असायला हवी. याउलट त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करायला हवे होते. दहशतवाद्यांच्या मनात भारताबद्दल दहशत निर्माण झाली आहे. जगात कुठेही लपून बसलो तरी भारत शोधून काढेल आणि शिक्षा देईल, हा धाक आतंकवाद्यांमध्ये निर्माण झाला आहे. आतापर्यंत देशाच्या इतिहासात ही नोंद घेणारी घटना आहे.

Chandrashekhar Bawankule, Pankaj Bhoyar : मंत्री येती घरा, प्रशासन पळती भरा भरा..!

शेतकरी कर्जमाफीचा विषय सध्या ज्वलंत आहे. त्याबाबत विचारले असता, निवडणुकीला समोर जाताना भाजपने संकल्पनामा दिला. त्यात आमच्या सरकारने पाच वर्षात कर्जमाफी करू, असे म्हटले आहे. आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी करू असं संकल्पनाम्यात नमूद आहे. सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल. पुढील वेळी आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ. त्यावेळी आमच्या संकल्पनाम्यातील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही, असा खात्री मंत्री बावनकुळे यांनी दिली.

Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

जो वचननामा आम्ही जनतेला दिला, तो पूर्ण करू. विरोधकांना शब्ददेखील फुटणार नाही इतका विकास आम्ही करू. कर्जमाफीसाठी वेळ लागणार आहे. मात्र संकल्पनामा पूर्ण करू. दिलेला शब्द महायुती सरकार पूर्ण करणार, असेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.