Breaking

Chandrashekhar Bawankule : धापेवाड्यात आलेला विकास निधी गेला कुठे?

 

Where has the Development Fund Gone of Dhapewada? : पालकमंत्री बावनकुळे यांनी केली अधिकाऱ्यांची पोलखोल

Nagpur विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने दिलेल्या निधीचा वापर योग्यरितीने झाला नाही. यामुळे या गावाचा विकास होऊ शकला नाही, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे जन्मस्थान असलेल्या धापेवाडात रविवारी (दि.२ मार्च) विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. काही वर्षांपासून या गावाच्या विकासासाठी दिलेला आमदार निधीचा खर्च योग्य पद्धतीने झालेला नसल्याचे बावनकुळेंनी निदर्शनास आणून दिले.

Chandrashekhar Bawankule, Parinay Fuke : नराधमाला कठोर शिक्षा होईल!

 

गेल्या पाच-दहा वर्षात या गावाच्या विकासासाठी दिलेला निधी वाया गेला. एनएमआरडीएच्या NMRDA माध्यमातून या गावाच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता. यावेळी आता जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. यापैकी १६५ कोटी रुपये मंदिराच्या विकासासाठी तर ३५ कोटी रुपये गावाच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती बावनकुळेंनी दिली.

या निधीच्या वापरामध्ये गडबड झालेली यापुढे चालणार नाही, अशी तंबी बावनकुळेंनी दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची नावेही घेतली. विकास कामाची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे. या कामावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माझेही लक्ष राहणार आहे. कामाचा आढावा घेण्यासाठी गडकरींनी महिन्यातून एक बैठक घेतल्यास कामाची अंमलबजावणी योग्यरितीने होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule : व्याघ्र प्रकल्पाशेजारील गावांना Protection!

 

रस्ताच गायब झाला – गडकरी

याच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धापेवाडा गावातील एका रस्त्यावर अतिक्रमण केल्याची माहिती समोर आणली. आमदार निधीतून धापेवाडा गावात रस्ता तयार केला होता. परंतु या रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे गावात अॅम्बुलंस सुद्धा येऊ शकत नाही. कोलबास्वामी मंदिरात जाण्यासाठी चांगला रस्ता उरलेला नाही, अशी खंत गडकरींनी व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule : पाणी आरक्षणावर मोहोर; टंचाईवर Solution!

आता गावाची जबाबदारी

विकासासाठी निधी आल्यानंतर या निधीचा वापर योग्यरितीने होत आहे का? हे तपासण्याची जबाबदारी आता गावकऱ्यांची आहे. गावामध्ये विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. पण गावातील लोकांनी नदी स्वच्छ झाल्यानंतर घाण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, या शब्दांत गडकरींनी कान टोचले.