Won’t get candidation by following the leaders : पालकमंत्री बावनकुळेंनी टोचले कान; उमेदवारीसाठी कार्यक्षमतेचा निकष
Amravati “भाजपमध्ये उमेदवारी शिफारशींवर नव्हे, तर कार्यक्षमतेच्या आधारे दिली जाते. जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्षांच्या मागे फिरून उमेदवारी मिळेल, असे समजणाऱ्यांची तिकीटच कापली जाईल,” असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शनिवारी परिणय बंध सभागृहात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, माजी खासदार नवनीत राणा, माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Amravati Administration : किती हा पाण्याचा उपसा? आता विहिरी खोदायच्या नाहीत
बावनकुळे म्हणाले, “आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ज्या कार्यकर्त्याची ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याची क्षमता असेल आणि जो पक्षाचे सर्व ११ कार्यक्रम प्रभावीपणे राबवेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल.”
“नेतृत्त्वाच्या हव्यासापेक्षा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम केल्यास पक्ष तुम्हाला संधी नक्की देईल. अध्यक्ष हा लीडरसारखा नव्हे, तर कार्यकर्त्यासारखा वागायला हवा,” असे सूचक विधान त्यांनी केले.
यावेळी बावनकुळे यांनी मेळघाटमधील प्रभुदास भिलावेकर व तिवसामधील रविराज देशमुख यांच्या त्यागाचे उदाहरण देत सांगितले की, “भिलावेकर व देशमुख यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानेच आज त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले. हेच भाजपचे संस्कार आहेत.”
Bacchu Kadu : प्रहारचे कार्यकर्ते चढले टाकीवर; शोले स्टाईल आंदोलन
“पक्षाने अमरावतीसाठी दोन जिल्हाध्यक्ष व एक शहराध्यक्ष नेमले आहेत. निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर सर्वांनी एकत्र बसून व्यूहनीती आखणे गरजेचे आहे. कोणीही गप्प बसू नये, प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहावे,” असे आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केले.