Chandrashekhar Bawankule : परिवहन मंत्र्यांसमोरच बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापले !

Bawankule Rebukes Officials in Front of Transport Minister Pratap Sarnayak: नागपुरातील सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न आणि टॅक्सी चालकांच्या मागण्या होतील पूर्ण

Mumbai : नागपूरला उपराजधानीचा दर्जा आहे. पण येथे वाहतुकीसाठी पुरेशा बसेस नाही. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अॅप बेस्ड टॅक्सी चालकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यावरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतप्त झाले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी बावनकुळेनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

नागपूरला उपराजधानीचा दर्जा असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याचा मुद्दा बावनकुलेंनी उचलून धरला. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत बावनकुळेनी आक्रमक भूमिका घेतली आणि नागपूरकरांच्या वाहतुकीच्या आणि चालकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले. नागपूरला जादा एसटी बसेस का दिल्या जात नाहीत, असा प्रश्न करत त्यांनी परिवहन विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर परिवहन मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपराजधानी म्हणून नागपूरला प्राधान्याने अतिरिक्त बसेस देण्याचे आश्वासन दिले.

Sudhir Mungantiwar : छत्रपतींच्या स्फूर्ती केंद्रात नतमस्तक झाले नरेंद्र मोदी, मुनगंटीवारांच्या पुढाकारात झाली होती स्थापना !

बैठकीत अॅप बेस्ड टॅक्सी चालकांच्या मागण्यावरही चर्चा झाली. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात अनेक वर्षांपासून चालक पदाची बिंदू नामावली Roster तयार करण्यात आलेले नाही. यावर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तातडीने बिंदू नामावली तयार करण्याचे आदेश दिले. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. याशिवाय अनुकंपा तत्वावरी १७ प्रबंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचेही आदेश त्यांनी दिले.

Thackerays plan : पराभवाच्या भीतीमुळेच उद्धव ठाकरेंचा डाव

कंट्रोलर हवा खात..
परिवहन विभागाचे कंट्रोलर फिल्डवर न राहता कार्यालयात बसून हवा खात असल्याच्या तक्रारी आहेत. यावरही बावनकुळे बैठकीत संतापले. कंट्रोलर फिल्डवर असले पाहिजे, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरात आरटीओ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी लाऊन धरली.