Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी केले सभापतींचे कौतुक

BJP leader praises Prof. Ram Shinde : राम शिंदे यांचा जाहीर सत्कार, जनतेला न्याय देण्याचा निर्धार

Amravati महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सभागृहात सभापतींचं कौतुक करण्याची फारशी संधी मिळत नाही. पण, अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात मात्र त्यांनी ही संधी साधली. निमित्त होते विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सत्काराचे.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रा. शिंदे यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, प्रवीण पोटे, ॲड. दिलीप एडतकर आदी उपस्थित होते.

Water shortage : धरणात मुबलक पाणी, पण नदीपात्रात ठणठणाठ!

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, “प्रा. शिंदे यांच्या रुपात विधान परिषदेचे नेतृत्व युवा, संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वाकडे गेले आहे. विधिमंडळात सदस्य आणि शासन यांच्यात समन्वय साधून त्यांनी छाप उमटवली आहे. सभागृहात कामकाज पूर्ण न होईपर्यंत ते उपस्थित राहतात.’

प्रा. राम शिंदे यांनी देखील सभागृहातील कामकाजातून लोकांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘विधान परिषद सभापतीपद हे संवैधानिक आहे. या पदावरून समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी असते. येत्या काळात सर्व घटकांना समन्वयातून न्याय देण्याचा प्रयत्न करेन,’ असं शिंदे म्हणाले.

Sharad pawar : पहलगाम हल्ल्यात फक्त पुरुषच टार्गेट, महिलांना धक्काही नाही !

सभापती पदाच्या निमित्ताने जनतेच्या कामाची मोठी जबाबदारी मला मिळाली आहे. हा विश्वास अधिक ऊर्जित करत सकारात्मक काम करेन, असंही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध विकासकामे हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “अहिल्यादेवींनी जसे काशी विश्वेश्वर, केदारनाथ मंदिरांचे जिर्णोद्धार केले, तसेच अनेक धर्मशाळा आणि घाट उभारले, त्याचा गौरव म्हणून अहिल्यानगर नामकरण तसेच सोलापूर विद्यापीठाला त्यांच्या नावाने ओळख देण्यात आली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांना नेहमीच पाठिंबा राहील आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.