Chandrashekhar Bawankule’s answer to Vijay Vadettiwar’s accusation : गिरीष महाजन आणि एकनाथ शिंदे दोघेही पर्यटकांना सांभाळत आहेत
Nagpur : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यामध्येही महायुतीच्या नेत्यांमध्ये श्रेय लाटण्याची लढाई सुरू आहे, असा घणाघाती आरोप काल (२४ एप्रिल) काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला आज (२५ एप्रील) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये कुठलाही श्रेयवाद नाही, असे ते म्हणाले.
नागपुरात आज महसूल मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाहीत की विसंवाद नाही. एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले, पर्यटकांना भेटले. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. तर गिरीष महाजन यांना आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून पाठवण्यात आले आहे. महायुतीचे तिन्ही मुख्य नेते एकत्रितपणे काम करत आहेत. काश्मीरमधून पर्यटकांना परत आणायचे आहे. तेथे जास्त व्हीआयपी मुव्हमेंट होऊ नये म्हणून जास्त जण गेले नाहीत.
Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ला म्हणजे देशाचे नुकसान आहे. यात कुणीही राजकारण करणे योग्य नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी काश्मीरचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाली. राहुल गांधी पहलगामला गेले तर चांगलेच आहे. सर्वच पक्षांनी एकत्र येऊन या स्थितीचा सामना करण्याची ही वेळ आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना परत पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. त्यांच्या निर्णयाचे आम्ही तंतोतंत पालन करू, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !
पाणी टंचाईबाबत विचारले असता, गुरांच्या छावण्या, पाणी टंचाई हे विषय कॅबिनेटमध्ये घेतले जातील. नागपूर जिल्ह्यात सध्यस्थितीत पाणी टंचाई नाही. या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पाणी टंचाईसंदर्भातील संपूर्ण जबाबदारी माझी आहे. त्या संदर्भात मी काम करणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.