Chandrashekhar Bawankule : विजय वडेट्टीवारांनी डॉ. तायवाडेंचे मार्गदर्शन घ्यावे !

Congress Leader Vijay Wadettiwar Should Seek Guidance from Dr. Babanrao Taywade : राजकीय बाऊ करू नये, उपसमितीकडे बाजू मांडावी

Nagpur : सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाहीये, ही बाब राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे. पण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. राजकीय दृष्ट्या डॉ. तायवाडे आणि विजय वडेट्टीवार हे एकाच पक्षात आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांनी डॉ. तायवाडे यांचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानंतर ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी पुढे सरसावला आहे. परवा नागपुरातील रवि भवनमध्ये वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात आली. आता मुंबईतही ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये न्यायालयीन लढाई आणि रस्त्यांवरील आंदोलने करण्यात येणार असल्याचे सुतोवाच वडेट्टीवार यांनी केले. याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांना आज (७ सप्टेंबर) पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

Muncipal Council : नगर परिषदेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’

यासंदर्भात बावनकुळे म्हणाले, काँग्रेस नेत्यांमध्ये विरोधाभास का आहे, हे कळत नाहीये. सामाजिक दृष्ट्या एखादी गोष्ट बरोबर नसेल तर त्यांनी सरकारला सांगितले पाहिजे. सरकारची उपसमिती आहे. वडेट्टीवार यांनी याचा राजकीय बाऊ करू नये. त्यांना काही खटकत असेल तर तो विषय त्यांनी उपसमितीसमोर मांडला पाहिजे. वडेट्टीवार यांनी न्यायालयात लढाई लढण्याची तयारी चालवली आहे. यावर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण रोज माध्यमांसमोर येण्यापेक्षा त्यांनी त्यांचे म्हणणे सरकारला सांगावे, असे ते म्हणाले.

Maratha reservation : ड्राफ्ट आधीच माहीत होता, अजेंड्यानुसार समाज वेगळा पाडला

छगन भुजबळ यांच्याशी मी स्वतः या विषयावर बोलणार आहे. त्यांचंही काय म्हणणं आहे, ते ऐकून घेऊन ओबीसींवर कुठेही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. सर्वांचं म्हणणं ऐकून घेणं हे उपसमितीचं काम आहे आणि आम्ही आपले कर्तव्य चोख बजावू, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.