Instructions to resolve technical issues in urban housing scheme : प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) दुसऱ्या टप्प्यासाठी कार्यशाळा
Nagpur नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.०’ या कार्यशाळेत ते बोलत होते.
एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
Nagpur Municipal Corporation : कंत्राटदारांची हिंमत वाढली होती; महापालिकेने ठोठावला दंड
योजनेच्या ऑनलाइन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याच्या सूचनाही बावनकुळेंनी दिल्या. ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे. त्यामुळे या योजनेची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन, सरपंच व ग्रामसेवकांच्या सहकार्याने नाव नोंदणीस गती द्यावी, असे बावनकुळे म्हणाले.
जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींचा गौरव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील वाकेश्वर, कोदामेंढी, सिरसोली, कामठी तालुक्यातील महालगाव, उमरी, उमरेड तालुक्यातील सुरगाव कुही तालुक्यातील तितुर, सावनेर तालुक्यातील पिपळा डा. ब. तसेच पारशिवनी तालुक्यातील उमरी पाली या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.