Let the public be benefitted with government schemes :जिल्हा स्तरावर जातीनिहाय आणि क्षेत्रनिहाय मॅपिंग करण्याचे निर्देश
Amravati “सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जातीनिहाय आणि क्षेत्रनिहाय मॅपिंग करून, त्यानुसार येत्या वर्षाचा ठोस आराखडा तयार करण्यात यावा,” असे स्पष्ट निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, प्रवीण पोटे तसेच धारणीच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आदी उपस्थित होते.
Sunil Tatkare : आमदार संग्राम जगतापांनंतर संग्राम कोते पाटलांनाही तटकरेंकडून ‘खो’ !
पालकमंत्र्यांनी सूचित केले की, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी कार्यरत असलेल्या योजनांचा परिणामकारक अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विभागीय समन्वय वाढवावा. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत. जात वैधता प्रमाणपत्र वाटपात कोणताही अडथळा न राहता कार्यवाही व्हावी.
यावर्षी आराखड्यात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि नाविन्यपूर्ण योजना यांना प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी व विशेष घटक योजनांमधून महिलांच्या आरोग्यासाठी उपाययोजना कराव्यात. शाळांमध्ये पाणी व वीज या मूलभूत सुविधांची पूर्तता करून ‘मॉडेल शाळा’ तयार करण्याचा प्रयत्न व्हावा.
दिव्यांग व्यक्तींचे स्वतंत्र मॅपिंग करून त्यांच्या गरजांसाठी तातडीने योजना आखाव्यात. सध्या सामाजिक न्याय विभागामार्फत २७ योजना राबवल्या जात असून, त्यांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिओ टॅगिंगची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सूचित केले.
Raj and Uddhav Thackeray : अस्तित्व टिकवायसाठी एकत्र यावंच लागेल, शत्रुचा शत्रू मित्र !
मेळघाटातील आदिवासी समाजाच्या बोलीभाषा व संस्कृतीचा विचार करून त्यांना योजनांची माहिती देण्यासाठी विशेष प्रचार माध्यमांची गरज असल्याचे ते म्हणाले. संविधानाबाबत जनजागृतीसाठी प्रत्येक घरात उद्देशिकेचे वाटप करण्याचे आवाहनही त्यांनी केले.