Sajid Khan : बाबाजानी दुर्राणीची होणार एसआयटी चौकशी

Chandrashekhar Bawankule’s announcement caught the attention of MLA Sajid Khan : आमदार साजिद खान यांच्या लक्षवेधीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

Akola : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शासकीय सर्व्हिस रोडच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता उभारलेल्या संकुलावर कारवाई करण्याची मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी विधिमंडळ सभागृहात केली. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या टीमविरोधातील जवळपास तीस अनधिकृत प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या तीन टर्मच्या आमदारकीच्या काळात पदाचा गैरवापर करत पाथरी तालुक्यात शासनाच्या मालकीच्या असलेल्या सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे ‘बाबा’ नावाचे अनधिकृत संकुल उभारल्याचा आरोप आहे. यापूर्वीही या प्रकरणावर विधिमंडळात लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत हे संकुल अनधिकृत असल्याचा अहवाल समितीने सादर केला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

Ajit Pawar : अ‍ॅग्री हॅकॅथॉनद्वारे राज्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती घडेल !

आमदार साजिद खान पठाण यांनी सभागृहात या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. “या व्यक्तीची एवढी दादागिरी आहे की, प्रशासनही हतबल झाले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या लक्षवेधीच्या उत्तरादाखल महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, “बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या टीमविरोधात आतापर्यंत तीसहून अधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अजूनही काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून कारवाई केली जाईल.”

Pratap Sarnaik : व्यवसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे

या घोषणेनंतर बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच, त्यांच्या अनेक भूखंड व्यवहारांतील गैरप्रकार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.