Breaking

‘Chava Ride’ app : ‘छावा राईड’ ॲपद्वारे ओला – उबरला टक्कर

Golden employment opportunity for Marathi youth. : मराठी तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

Mumbai : ओला-उबरसारख्या आंतरराष्ट्रीय खासगी कॅब कंपन्यांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने आता स्वतःचं मोबाईल ॲप आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘छावा राईड’ या नावाने राज्य सरकारचं अधिकृत ॲप लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. छावा राईड ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी, एसटी बस यांची तिकीट बुकिंग करता येणार असून, या ॲपचा मुख्य उद्देश खासगी कंपन्यांची मक्तेदारी तोडून राज्यातील मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेनंतर हे ॲप लवकरच सुरू करण्यात येईल. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’ या पर्यायांमधून ‘छावा राईड’ हे नाव अंतिम करण्यात आलं.
या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Ashish Jaiswal : गोगावले पालकमंत्री व्हावे, ही मागणी योग्यच !

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींना स्वतःचं वाहन घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुंबई बँकेमार्फत केवळ १० टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार असून, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी यांच्यामार्फत ११% व्याज परतावा अनुदान दिलं जाणार आहे. त्यामुळे या कर्जावर प्रत्यक्षात शून्य टक्के व्याज लागणार आहे, असे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

‘छावा राईड’ ॲपमुळे स्थानिक तरुणांना त्यांच्या भागातच रोजगार मिळेल. रिक्षा, टॅक्सी, मिनीबस चालवण्यासाठी किंवा व्यवस्थापनासाठी ही संधी खुली राहणार आहे. यातून हजारो तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराच्या दिशेने मोठी संधी मिळेल, असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.

Local body Elections 2025 : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचा बिगुल दिवाळीनंतर !

हे ॲप राज्य परिवहन महामंडळामार्फत अधिकृतपणे चालवण्यात येणार असून, सरकारच्या समुच्चयक धोरणाच्या अनुषंगाने त्याची रचना केली जात आहे. प्रवाशांसाठी सोयीस्कर बुकिंग, शुल्क सुसंगतता, स्थानिक ड्रायव्हर्सचा सहभाग आणि तक्रार निवारण यंत्रणा हे ॲपचे वैशिष्ट्य असेल.खासगी कॅब सेवा कंपन्यांचे दरांवर नियंत्रण नसल्याने आणि स्थानिक तरुण बेरोजगार राहिल्याने सरकारवर मोठा दबाव होता. ‘छावा राईड’ ॲपद्वारे यावर उपाय म्हणून सरकारने अधिकृत पर्याय पुढे आणला आहे. यामुळे प्रवाशांनाही स्थानिक व परवडणाऱ्या सेवा मिळतील, तर तरुणांना आर्थिक आत्मनिर्भरतेची संधी मिळेल.

____