Breaking

Chhaava Movie : ‘छावा’ने अपमान केला नाही, मान वाढवला!

Demand for tax exemption of Chhaava films : चित्रपट करमुक्त करण्याची छावा संघटनेची मागणी

Akola चित्रपटांमधून बरेचदा महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो. त्यावरून वाद होतात. महाराष्ट्राने आजवर अशा अनेक घटना बघितल्या आहेत. अनेकदा महापुरुषांविरोधात अपशब्द उच्चारले जातात. मात्र, ‘छावा’सारखे काही चित्रपट या महापुरुषांचा खरा इतिहास जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. या चित्रपटाने अपमान तर केला नाहीच, उलट मानच वाढवला आहे, अशी भावना व्यक्त करून चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी अकोला जिल्हा छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Naxalite Movement : चार जहाल महिला नक्षलवाद्यांचा खात्मा!

याप्रसंगी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ. संजय सरोदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, रवी मुळे, निखिल श्रीनगर, अमोल हिंगणे, आशु वानखडे पैलवान, दीपक बिहाडे, बबलू वसु, नितीन चव्हाण, मनोहर मांगटे पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या चित्रपटगृहांमधील तिकिटांचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऐतिहासिक चित्रपट पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे “छावा” हा चित्रपट करमुक्त केल्यास अधिकाधिक नागरिकांना हा ऐतिहासिक चित्रपट पाहता येईल. त्यातून संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल. संघटनेच्या वतीने राज्य सरकारने तातडीने हा चित्रपट करमुक्त करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Champions Trophy : सट्टेबाजांची पसंती ग्रामीण भागाला!

पहिल्याच आठवड्यात २०० कोटी
विकी कौशल Vicky Kaushal याची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ने पहिल्याच आठवड्यात २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढेच नव्हे तर या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.