Assembly Speaker should take initiative to stop distorted incidents : राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भुजबळांनी व्यक्त केली चिंता
Mumbai संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, माऊली सोट, कैलास बोऱ्हाडे या घटना वैभवशाली महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या आहेत. यातील आरोपींना कडक शिक्षा करावी. तसेच या प्रश्नांवर विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा. सर्व पक्षाचे नेते, विविध समाजांतील पदाधिकारी, पत्रकार, साहित्यिक, समाज घटकांना एकत्र आणावे. महाराष्ट्रातील क्रौर्य थांबविण्यावर चिंतन व्हावे, अशी अपेक्षा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी, कांदा निर्यात, नाशिक कुंभमेळा आदी प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. गेल्या काही महिन्यांमध्ये विकृत घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला. महापुरुषांच्या या महाराष्ट्राला दृष्ट लागली आहे. अश्यात अध्यक्षांनी पुढाकार घेऊन काहीतरी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Chhagan Bhujbal : आता लासलगाव येथे थांबणार देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी किसान रेल्वे
परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडला. या प्रकरणाची चौकशी होणार की नाही? तो दलीत मागासवर्गीय आहे म्हणून कारवाई होणार की नाही? लातूरमधील माऊली सोट या धनगर समाजाच्या मुलाला मारहाण करण्यात आली. त्यावर कुणी बोलणार की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवमंदिरात गेला म्हणून जालन्यात कैलास बोऱ्हाडे या धनगर व्यक्तीला लोखंडी सळईने चटके देण्यात आले. या प्रकरणावर कुणी बोलणार आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
Chhagan Bhujabal : महाराष्ट्र शासनालाही नाशीक कुंभमेळ्यासाठी मिळवता येतील ७,५०० कोटी !
‘शेतकऱ्यांसाठी शेततळे निर्माण करण्यासाठी योजना आहे. मात्र अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वितरित करण्यात यावे. इथेनॉलच्या धोरणाबाबत धरसोडपणा करू नये,’ असं भुजबळ म्हणाले.