Breaking

Chhagan Bhujbal : स्त्री -पुरुष समानतेचे फुले दाम्पत्याचे स्वप्न आज साकार होत आहे !

 

The dream of the Phule couple for gender equality is coming true today : छगन भुजबळ यांच्या हस्ते परभणी येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

Parbhani : महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतक-यांचा आसूड, गुलामगिरी वाचल्यानंतरच त्यांनी केलेल्या कामाची महती कळेल,असे सांगून सर्वांनी महात्मा फुले यांची पुस्तके आवर्जून वाचावी आणि त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज परभणी जिल्हा परिषदेसमोरील चौकातील आद्य शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना साकोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Nitin Gadkari : एकरी ३० टन संत्र्याचे उत्पादन आवश्यक!

छगन भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी यापूर्वीच परभणीला येऊन गेल्याचे सांगितले. मंडल आयोगातील शिफारशींबाबत त्यांनी माहिती दिली. स्त्री -पुरुष समानता आणण्याचे फुले दाम्पत्याचे स्वप्न आज साकार होत आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्रियांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आज मुलींना मुलांच्या बरोबरीने उच्च शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी महोज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री म्हणून आम्ही राज्य शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवित आहोत, असे सांगत नागपूरसह प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधत असल्याची माहिती दिली.

Devendra Fadanvis : शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केलाय !

 

मुलींना मोफत शिक्षण, १०० विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बसचा मोफत प्रवास अशा विविध योजनांची माहिती मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली. तसेच १ जानेवारी १८१८ रोजी फुले दाम्पत्याने भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. लवकरच येथे फुले दाम्पत्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमीपूजनही करण्यात आल्याचे मंत्री सावे म्हणाले.

सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना जिल्ह्यातील एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करूयात. एक उच्चशिक्षित, संस्कारीत समाज म्हणून आपण सर्वजण एकत्रित काम करूयात, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी उपस्थितांना केले.

Vijay Jawandhiya : ..तर मोदींनी सांगून टाकावे की, ‘शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरू नका’

माजी महापौर प्रताप देशमुख यांनी पुतळा उभारण्यामागील पार्श्वभूमी थोडक्यात विशद केली. रोहित राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे शिल्पकार धनंजय वडगीरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने स्वागत केले.