Chhagan Bhujbal : माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य? भुजबळही व्यक्त झाले !

Laxman Hake says this in a prank on a viral video : व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाके म्हणतात हे खोडसाळपणातून

Solapur : ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. या व्हिडिओमध्ये हाकेंनी माळी समाजाबद्दल वक्तव्य केल्याचे दिसत असून, त्यावरून ओबीसी समाजातच फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हा व्हिडिओ खोडसाळपणातून तयार करण्यात आल्याचा दावा करत हाकेंनी तातडीने स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाके म्हणाले, असल्याचं दिसतं की, “सध्या ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे गेले आहे. ही माळी समाजाची पोटदुखी आहे. भुजबळांनी कधीच कोणाला मोठं होऊ दिलं नाही.” या वक्तव्यावरून माळी समाजातून हाकेंवर तीव्र टीका सुरू झाली आहे. मात्र हाके यांनी याला विरोध करत सांगितले की, “माझा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार केलेला खोडसाळ कट आहे. यामागे ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. माझ्या ओबीसी बांधवांनी अशा व्हिडिओंच्या जाळ्यात अडकू नये.”

Adivasi Pardhi Development Council : सावकाराची गुंडगिरी, घरांवर चालवला जेसीबी, अनेक कुटुंब रस्त्यावर !

हाकेंनी स्पष्ट केलं की, “मी काय आहे हे सर्व ओबीसी समाजाला ठाऊक आहे. सकाळीच माझं भुजबळ साहेबांशी बोलणं झालं असून त्यांनी मला मॉरल सपोर्ट दिला आहे. मी भुजबळ साहेबांना आदर्श मानतो. आमच्यात काही गैरसमज लावण्याचा प्रयत्न झाला तर तो सहन केला जाणार नाही. अशा काही विघ्नसंतोषी लोकांना ओळखलं असून, गरज पडली तर मी त्याबाबत पत्रकार परिषद घेईन.”

यावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, “लक्ष्मण हाके यांनी मला दोन-तीन वेळा फोन केला. काही गैरसमज झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत ते खुलासा करणार आहेत. त्यामुळे इतरांनी कोणतीही घाईघाईची प्रतिक्रिया देऊ नये.”

दरम्यान, हाकेंनी आणखी स्पष्ट केलं की, “मी कुठलीही चूक केलेली नाही, त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच नाही. मात्र नवनाथ वाघमारे हे माझे सहकारी असून, त्यांना गैरसमज झाला असेल तर मी त्यांच्याशी बोलेन.”

Akola BJp : भाजपा पदवीधर सेल प्रमुखपदी प्रा. अनुप शर्मा

मराठा आरक्षण आंदोलनाला वेग देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत हाकेंनी ओबीसी समाजाचा आवाज मोठा केला होता. मात्र आता या व्हायरल व्हिडिओमुळे ओबीसी एकजूट चळवळीत खळबळ माजली आहे. हाके यांचे स्पष्टीकरण आणि भुजबळांचा प्रतिसाद आल्यानंतर वाद थांबतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.