Breaking

Chief Minister Youth Training Scheme : सहा हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना सप्टेंबरनंतर ‘नो एंट्री’!

Six thousand young trainees won’t get entry after September : ११ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीनंतर नव्या उमेदवारांना संधी

Amravati मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६,०७१ युवक-युवतींना शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये ११ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र येत्या सप्टेंबर २०२५ मध्ये हा कालावधी संपल्यावर या प्रशिक्षणार्थींना पुन्हा संधी दिली जाणार नाही, अशी स्पष्टता करण्यात आली आहे. त्यानंतर केवळ नवीन नोंदणीकृत प्रशिक्षणार्थींनाच संधी मिळणार आहे.

राज्य शासनाने ९ जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केली. त्याअंतर्गत युवकांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत विविध शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी संधी मिळाली. प्रारंभी ६ महिने आणि नंतर ५ महिने मुदतवाढ देण्यात आल्याने एकूण ११ महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आला होता.

Sudhir Mungantiwar : मराठीच्या मुद्यावर दूर दूरपर्यंत कुठलेही राजकारण नाही !

योजनेमागचा उद्देश म्हणजे युवकांना शासकीय आणि औद्योगिक वातावरणाचा अनुभव देणे, त्यातून नोकरीपूर्व कौशल्ये आणि रोजगारसंधी निर्माण करणे हा होता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली.

दृष्टिक्षेपात आकडेवारी (अमरावती जिल्हा)

एकूण आस्थापना २७१
शासकीय आस्थापना २०३
खासगी आस्थापना ६९
कार्यरत प्रशिक्षणार्थी ६,०७१
प्रशिक्षण कालावधीची समाप्ती सप्टेंबर २०२५

Mul bus depot : मुल बस आगारासाठी सोमवारी मंत्रालयात बैठक, मुनगंटीवारांचे आणखी एक यश !

पुढे काय?

सप्टेंबर २०२५ नंतर या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणार्थींना पुन्हा संधी मिळणार नसली तरी नवीन नोंदणीसाठी अर्ज सुरू होतील आणि त्यानुसार पुढील गटांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे इच्छुक युवकांनी वेळेवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.