Breaking

Chief Minister’s Help Desk : गरजू रुग्णांना आता शहरातच मिळणार मदतीची माहिती

Needy patients will now get information about help in the city itself : मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीत स्थापना

Akola जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती अकोल्यातच मिळू शकणार आहे.

महागड्या खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेणे अनेक गरजूंसाठी आर्थिकदृष्ट्या अशक्य होते. शिवाय, अनेक अत्यावश्यक उपचार हे नागपूर, पुणे, मुंबईसारख्या महानगरांपुरते मर्यादित असतात. त्यामुळे गरजूंना तातडीने आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला होता.

Castbase census: जातीनिहाय जनगणना; भाजपपाठोपाठ काँग्रेसचाही जल्लोष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही सेवा आता प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील कक्षाचा शुभारंभ राज्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कक्षाच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस केली जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना मंत्रालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही. या उद्देशाने एक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली.

Nitin Gadkari : कठोर भाषेत बोलले, पण मनाला जखम होऊ दिली नाही!

या निर्णयामुळे गरजूंना त्यांच्या जिल्ह्यातच मदतीसाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन मिळणार असून, अनेकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.