Breaking

Chief Secretary of Maharashtra : मुख्य सचिवांचा सल्ला, ‘उत्पन्नाचे स्रोतही वाढवा’

Chief Secretary advised to increase sources of income : महापालिकेतील विकासकामांचा घेतला आढावा

Nagpur राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शुक्रवारी नागपूर मनपाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामांच्या विस्तारासमवेत आपल्या आर्थिक क्षमताही विस्तारल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण प्रत्येक प्रकल्पातील व्यावसायिक क्षमता वाढविणार नाही तोपर्यंत विकासाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपले उत्पन्नाचे स्रोत हे आपण बळकट केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

मेट्रो भवनला त्यांनी भेट दिली. महामेट्रो, नागपूर विकास प्राधिकरण, महानगरपालिकाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नासुप्र सभापती संजय मीना, महा मेट्रो संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी उपस्थित होते.

MoS Prataprao Jadhav : पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

आर्थिक क्षमता विस्तारण्यासाठी प्रत्येक विभागाने, कार्यालयाने आपली टीम बळकट केली पाहिजे. आपल्या विभागातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे ही भावना मानव संसाधनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सौनिक यांनी मेट्रोभवन येथील एक्सपरियन्स सेंटर, सिटी सेंटर मॉडेल, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (ओसीसी) याची माहिती घेतली. मेट्रो ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत देखील त्यांना माहिती प्रदान करण्यात आली.

मेट्रो ऑपरेशन्सच्या डॉट नेट, ६-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणीदरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले. मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यावसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कशा प्रकारे पुढे आणता येईल. तसेच प्रेरित करता येईल याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश सौनिक यांनी यावेळी दिले. फर्स्ट अँड लास्ट माइल कनेटिव्हिटीअंतर्गत नागपूर महापालिकासोबत योग्यरीत्या नियोजन करून मल्टिमॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

एक ट्रीलियनची आर्थिक व्यवस्था आपल्याला साकारायची आहे. यासाठी नागपूर विकास प्राधिकरण, मनपा, महामेट्रो व इतर प्राधिकरणांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे आले पाहिजे. आपण ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प साकारले आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी तेथील प्रसिद्ध झालेल्या उद्योग व्यवसायांना प्राधान्याने सामावून घेतले पाहिजे. यातून प्रत्येक ठिकाणी व्यवसायाची एक सक्षम साखळी निर्माण होईल, असंही त्या म्हणाल्या.

Dabhadi robbery case twist : दाभाडी येथील दरोडा प्रकरणाला कलाटणी

महामेट्रोला प्रत्येक स्टेशनवर यादृष्टीने मोठी संधी असून एक विकासाचा मार्ग यातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यक्त केला. मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यवसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कश्या प्रकारे पुढे आणता येईल व प्रेरित करता येईल या करता उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.