Farmers are angry over the injustice in crop insurance payments : पीकविमा रकमेतील अन्यायाविरोधात संताप, पुढच्या आठवड्यात विमा कार्यालयात मुक्कामाचा इशारा
Chikhali तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा रकमेतील तफावत आणि अन्यायकारक वितरणाविरोधात आंदोलन छेडले. २०२४-२५ मध्ये झालेल्या पीक नुकसानीवर ६१ हजार १५६ शेतकऱ्यांना १०८ कोटींची विमा रक्कम मंजूर झाली असली तरी, अनेकांना तुटपुंजी रक्कम मिळाल्याने संताप उसळला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली कृषी विभागात ठिय्या देत विमा कंपनीच्या प्रतिनिधींना घेराव घातला.
रानअंत्रीसह विविध गावांतील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी केलेल्या क्लेमवर, एकसारखा सर्वे असूनही काहींना जास्त आणि अनेकांना कमी रक्कम मिळाल्याचे पुरावे दाखवले. या प्रश्नावर विमा कंपनीचे प्रतिनिधी अन्नुत्तरीत राहिले. सरनाईक म्हणाले – “विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. एकाच सर्वेवर वेगवेगळा निकाल देऊन कंपन्या जबाबदारी झटकत आहेत.”
Maratha reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये!
विमा कंपन्यांनी कोणत्या निकषानुसार रक्कम वितरित केली हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. शेतकरी नेत्यांनी सर्वे फॉर्म उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “हे फॉर्म दिल्यास खरी नुकसानग्रस्त क्षेत्रफळे उघडकीस येतील, म्हणूनच ते मुद्दाम लपवले जात आहेत,” असा आरोप करण्यात आला.
सरनाईक यांनी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी ठोस निर्णय न झाल्यास “पुढील आठवड्यात विमा कार्यालयात मुक्काम ठोकू” असा इशाराही दिला.
Local Body Elections : प्रभाग रचनेच्या हरकतींवरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने!
शेतकऱ्यांचे क्लेम झिरो दाखविण्याच्या तक्रारींची दखल घेत, “दोन दिवसांत रक्कम वितरित करण्यात येईल, सर्वे फॉर्म उपलब्ध करून दिले जातील आणि समितीमार्फत अहवाल पाठविला जाईल”, असे आश्वासन कृषी विभागाने दिले. आंदोलनात भरत जोगदंडे, रविराज टाले, राजू कुटे, लालसिंग मोरे, सौरव झाल्टे, नारायण झाल्टे यांच्यासह रानअंत्री, अंबाशी, दिवठाणा येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.








