Rigorous imprisonment for those who beat ex-soldier : माजी सैनिकाला मारहाण; दोघांना तीन वर्षांची शिक्षा
Buldhana समाईक शेतधुऱ्यावर बैल चारण्याच्या कारणावरून माजी सैनिकास गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना चिखली न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ४०,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
तालुक्यातील बेराळा येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त माजी सैनिक प्रकाश जाधव यांना २ सप्टेंबर २०१५ रोजी जांभोरा शिवारात आरोपींनी मारहाण केली होती. त्यावेळी प्रशांत प्रकाश जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी दिलीप भाऊराव जाधव आणि रमेश भाऊराव जाधव (दोघेही रा. बेराळा) यांनी “समाईक धुऱ्यावर बैल का चारतो?” या कारणावरून कुर्हाडीने आणि लोखंडी गजाने त्यांच्या वडिलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचे हात-पाय गंभीर जखमी झाले.
त्यानंतर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीत एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षी ग्राह्य धरून चिखलीचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हरिभाऊ देशिंगे यांनी दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावली.
Majhi Vasundhara : नागपूर विभागातून आंजी ग्रामपंचायतने मारली बाजी
३ वर्षे सश्रम कारावास प्रत्येकी ४०,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर जखमी प्रकाश जाधव यांना नुकसानभरपाई म्हणून ५०,००० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील मोहम्मद बशीर मोहम्मद नसीर यांनी युक्तिवाद केला, तर पोलीस हवालदार गंगाधर दराडे यांनी कोर्ट पेरवीचे काम पाहिले.