Breaking

Chikhali Grampanchayat : सरपंचाच्या विरोधात बहुमताने अविश्वास!

No-confidence motion against the Sarpanch by a majority : चिखली ग्रामपंचायतीत सत्ता संघर्ष; प्रस्ताव मंजूर

Buldhana चिखली तालुक्यातील कव्हळा-सावरखेड गट ग्रामपंचायतीचे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच रविंद्र नारायण डाळीमकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात सदस्यांना विश्वासात न घेणे आणि विकासकामांमध्ये असहकार्य करणे, या कारणास्तव उपसरपंचासह १० सदस्यांनी २८ मार्च रोजी तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

ग्रामपंचायतीत एकूण १२ सदस्य आहेत, त्यापैकी ११ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. विशेष सभा तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी संतोष काकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच डाळीमकर यांची मतदान गुप्त पद्धतीने घेण्याची मागणी कायदेशीर तरतुदीअभावी फेटाळण्यात आली. त्यानंतर हात वर करून मतदान घेण्यात आले.

Uddhav Thackeray : उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट, घेतली वक्फ विरोधी भूमिका !

तहसीलदार काकडे यांनी ११ पैकी १० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने, प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यावेळी सरपंच डाळीमकर, उपसरपंच आकाश सुरसे, तसेच सदस्य किरण पवार, अशोक खंडारे, राखी जाधव, दुर्गा इंगळे, पवनसिंग इंगळे, मायावती इंगळे, संगीता डाळीमकर, संदीप कांडेकर, प्रल्हाद महाले आणि उषा महाले उपस्थित होते.

ग्रामपंचायत अधिनियमातील नव्या सुधारणा लक्षात घेता तहसीलदारांच्या उपस्थितीत मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ग्रामसभा बोलावली जाणार आहे. या सभेला किमान १५ टक्के ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक असेल. तसेच हात वर करून मतदान प्रक्रियेद्वारे अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार काकडे यांनी दिली.

Atul Londhe : कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी !

ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेले रविंद्र डाळीमकर यांच्या पॅनलमधून केवळ दोनच सदस्य विजयी झाले होते, मात्र तेही त्यांच्यापासून दूर झाले. बहुमत असलेल्या गटाच्या उमेदवाराला सरपंचपद मिळाले नसल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.