China has no influence in Ladakh : सोनम वांगचुक यांच्या दाव्याने खळबळ
Nagpur थ्री इडियट्स चित्रपटामुळे चर्चेत आलेले पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी चीनचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर चीनचा प्रभाव तेथे वाढेल, असा आराेप केला जाताे. खरे तर आमच्या आंदाेलनाविषयी लाेकांना संभ्रमित करण्यासाठी हे पिल्लू सोडण्यात आले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
सिक्कीम, अरुणाचल, उत्तराखंड हे चीनच्या जवळ आहेत. त्यांच्यावर कधी चीनने कब्जा केला नाही, ते आजही ‘भारत माता की जय’ म्हणतात. असा दावा त्यांनी केला आहे. वांगचुक यांना चीनकडून सुरू असलेल्या कुरापती दिसत नाहीत, की ते चीनच्या हातचे खेळणे झाले आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
CM Devendra Fadnavis : ‘महाज्योती’तर्फे पाच जिल्ह्यांमध्ये Excellence Centres
माझा आवाज दाबला जात आहे
नागपुरात वांगचुक यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मी लडाखमधील साैर ऊर्जा प्रकल्पाबाबत एक व्हिडीओ केला हाेता, जाे यू-ट्यूबवरून गायब करण्यात आला. जेव्हापासून लडाख व त्यानिमित्ताने भारतातील पर्यावरणावर बाेलायला लागलाे. तेव्हापासून साेशल मीडियावरील माझा आवाज दाबला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
Sports authority of India : खेलो इंडिया प्रशिक्षकांना निम्मे मानधन
लडाखला हवा राज्याचा दर्जा
चीनच्या पर्यावरण धाेरणावर बाेललाे तेव्हासुद्धा असेच झाले हाेते. उणे १५ डिग्री तापमानात उपाेषण आणि पदयात्रा काढल्यानंतर केंद्र सरकार लडाखच्या मुद्द्यावर चर्चेस तयार झाले. ३ डिसेंबरच्या चर्चेत राेजगाराच्या मुद्यावर सकारात्मकता दर्शविली. येत्या १५ जानेवारीला पुन्हा बैठक आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या शेड्यूलसाठी चर्चा हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतून कशाला हवा प्रतिनिधी?
लडाखचा कारभार पाहण्यासाठी दिल्लीतून प्रतिनिधी (गव्हर्नर) पाठविणे याेग्य नाही. कारण त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव नसते. त्याऐवजी स्थानिक लाेकांना कारभारात सहभागी करणे आवश्यक आहे. किमान ते आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतील. अन्यथा गुंतवणूक व विकासाच्या नावाने लडाखची स्थिती खराब हाेईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली