Chitra Wagh : सुरक्षित स्वच्छतागृहे नसल्यास पेट्रोल पंप, हॉटेल मालकांवर होणार कारवाई !

 

Minister Shivendraraje Bhosale’s assurance on MLA Chitra Wagh’s demand : आमदार चित्रा वाघ यांच्या मागणीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे आश्वासन

Mumbai : महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृह. हा प्रश्न आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. राज्यभरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या, त्यांची दुरावस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्यांना गर्भाशयाचा कर्क रोगासारख्या गंभीर समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा राज्यभर उपलब्ध व्हायलाच हवी, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात केली. शौचालये पाहिजे म्हटल्यावर शासनातर्फे ती बांधून दिली जातात. मात्र त्यांच्या देखभालीचे काय? स्वच्छतागृहात स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा नसल्यास महिलांनी तक्रार कोणाकडे करावी, हा प्रश्न उरतोच. त्यांच्या मागणीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Fraud Birth-death records : ११ हजार जन्म-मृत्यूच्या नोंदणीचा लागणार Result!

संपूर्ण राज्यभरात QR कोड तक्रार प्रणाली मुंबईसह राज्यभरात अस्तित्वात आणावी. तसेच ही QR कोड तक्रार प्रणाली ही स्थानिक बॉडींशी जोडली जावी. महिला तक्रार करण्यासाठी हा कोड स्कॅन करतील आणि आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेणे हे स्थानिक बॉडीना बंधनकारक असेल. राज्यात अशाप्रकारची प्रणाली निर्माण झाली तर इतर राज्यांसाठी महाराष्ट्र राज्य हे आदर्श ठरेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वच्छभारत अभियानाला AI ची साथ मिळेल हे नक्की.

Water department : पाणीपट्टी त्रुटींविरोधात आंदोलनाचा Impact; संयुक्त बैठक होणार

राज्यभरातील सर्व हॉटेल्स आणि मॉलमधील स्वच्छतागृहांची पाहणी करावी. अस्वच्छ, सुविधा नसलेल्या आणि असुरक्षित स्वच्छतागृहे ठेवलेल्या मालकांचे लायसंन्स रद्द करावे. राज्यभरातील सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांची पाहणी व ऑडीट करावे. अस्वच्छ, सुविधा नसलेल्या आणि असुरक्षित स्वच्छतागृहे ठेवलेल्या पेट्रोलपंप चालकांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Nandgaon Khandeshwar Police : पाच हजार रुपयांची लाच मागितली, पोलीस उपनिरीक्षकाला अटक!

या विषयावर झालेल्या चर्चेत आमदार वाघ यांच्या मागणीला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शहरी भाग तसेच महामार्गांवरील हॉटेल्सवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.