Breaking

Clash between two groups due to molestation of a married woman : विवाहितेच्या विनयभंगावरुन दाेन गटात हाणामारी!

बुलढाणा

Stone pelting caused tension : परस्परविराेधीत तक्रारीवरून दाेन्ही गटाच्या लाेकांवर गुन्हे

Chikhli येथे विवाहितेचा विनयभंग केल्याच्या कारणावरून दाेन गटात हाणामारी झाली. या घटनेदरम्यान दगडफेकसुद्धा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पाेलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल हाेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणात दाेन्ही गटाच्या परस्परविराेधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली. गाेरक्षणवाडीतील शेख सोहेल शेख अफसर याने अश्लील इशारे करण्यासह महिलेच्या लज्जेस बाधा पाेहोचेल अशी कृती केली. त्यास विरोध केला असता त्याने मारहाण करून वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेचा पती समजावण्यास गेला असता त्यालाही मारहाण केली.

शेख सोहेल शेख अफसर, शेख फैजान व मोहम्मद रजा या तिघांनी लोटपाट, शिवीगाळ करत महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी शेख सोहेल शेख अफसर, शेख फैजान व मोहम्मद रजा या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या गटाच्या शेख जाफर शेख कासम याने देखील तक्रार केली आहे. आनंद नगरमधील हरी पवार, पवन सुरडकर व पिंटू सुरुशे या तिघांनी पत्नीला मोबाइल नंबर का मागितला या कारणावरून काठी, कटर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी हरी पवार, पवन सुरडकर व पिंटू सुरुशे या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे या भागात दगडफेकीचाही प्रकार घडला होता. त्यामुळे काही काळ किरकोळ तणावही निर्माण झाला होता.

पाेलिसांच्या सतर्कतेने निवळला तणाव
वाद झाल्यानंतर दाेन्ही गटातील लाेक आमने सामने आले हाेते. तसेच दगडफेकही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच चिखली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे, पुढील अनर्थ टळला. दगडफेकीमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला हाेता.