Clashes between two groups at Hatrun; Six injured, one in critical condition : दगडफेक, वाहनांची जाळपोळ; गावात तणावपूर्ण शांतता
Akola बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात सोमवारी दुपारी दोन गटांत मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच एका चारचाकी वाहनाची जाळपोळ करण्यात आली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले आणि पीएसआय गणेश कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) पडघन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) प्रमुख शंकर शेळके यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : कर्जमाफी न केल्यास विधानसभेवर ट्रॅक्टर मोर्चा
या वादात नूर मोहम्मद शेख रहमान (२५), शेख हाफिज हसन (६०), शेख कदीर, शेख रहमान कुरेशी, शेख मलंग शेख मोहम्मद, आणि शेख कदीर शेख हुसेन (सर्व रा. हातरुण) हे सहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हातरुण येथे झालेल्या या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.