Sudhir Mungantiwar says a clean, beautiful and safe city is the true service : रोगराई टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी विशेष स्वच्छता अभियान राबवा
Chandrapur : पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचलेली घाण, कचरा पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यांवर येतो. अतिवृष्टी झाल्यास संपूर्ण घाण रस्त्यांवरून वाहताना दिसते. त्यामुळे रोगराई पसरते. त्यामुळे तहाण लागल्यावर विहिर खोदण्यापेक्षा आत्तापासून शहरांमध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवा, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर महानगरपालिका तसेच बल्लारपूर, मूल नगर परिषद आणि पोंभूर्णा नगर पंचायत प्रशासनाला आमदार मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पत्र देऊन स्पष्ट सूचना दिल्या आहेत. साधारणतः ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात होते. त्यापूर्वी स्वच्छतेची सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. ज्या – ज्या नाल्यांची सफाई करण्यात आली, त्याची माहिती नागरिकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिली पाहिजे, असेही त्यांनी सुचवले आहे.
Sudhir Mungantiwar : इरई नदीसाठी पालकमंत्री उईके आणि मुनगंटीवारांनी दिला आपला पगार !
केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देताना ती छायाचित्रांसह द्यावी. वर्तमान पत्रे व इतर माध्यमांवर माहिती प्रसिद्ध करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे, यासाठी ही कामे करणे अत्यंत महत्वाचे आहे, याकडेही आमदार मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या कामांचा आढावा आमदार मुनगंटीवार यांची यंत्रणा सातत्याने घेत राहणार आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !
नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी आत्तापासूनच पावले उचलावी लागतील. या पावसाळ्यात नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पूर्ण शक्तीने कामाला लागावे. शेवटी स्वच्छ, सुंदर, आणि सुरक्षित शहर हीच खरी सेवा आहे, असे म्हणत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सजग राहण्याचे आवाहन केले आहे.