The officers of Zilla Parishad took the Chief Minister’s instructions seriously : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचा परिणाम, अधिकारी पोहोचू लागले ग्रामीण भागात
Nagpur राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या सर्व विभागांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या आराखड्याचे टार्गेट दिले आहे. यामुळे नागपूर जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. एरवी वातानुकुलित दालनात बसून राहणारे अधिकारी ग्रामीण भागात प्रत्यक्ष पोहोचू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचा धसका आता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीदेखील घेतल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना शंभर दिवसांचा अजेंडा दिला आहे. यामध्ये कार्यालय निटनेटके ठेवणे, कार्यालयात वेळेवर पोहोचणे येथपासून ते अगदी रेकॉर्ड्स अपटेड करण्यापर्यंत अनेक कामे यामध्ये दिलेली आहेत. त्याचाच एक भाग शिस्तीचा आहे. मुख्यमंत्र्यांनी लावलेली शिस्त अधिकारी, कर्मचारी किती दिवस पाळतात, हे आता वेळच ठरवेल.
Salon and Beauty Parlor Association : नट्टा-थट्टा महागणार? दरवाढ होण्याची शक्यता!
जि. प.च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अधिकारी ग्रामीण भागाचा दौरा करीत आहेत. एरवी जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी नागपूर शहरात बसूनच कारभार करतात. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी स्वत: दौऱ्यावर निघाले. त्यामुळे एरवी मुख्यालयात बसून आढावा घेणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी कामाला लागले.
Dr. Pankaj Bhoyar : १०२ भुखंडांचा प्रश्न आता राज्यमंत्र्यांच्या कोर्टात !
महामुनी यांनीदेखील विविध योजनांचा आढावा घेतला. त्यात घरकुल बांधकाम, जन व नागरी सुविधा, पंधरावा वित्त आयोग, कर वसुली, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, वाढीव शौचालय बांधकाम, दलित वस्ती सुधार योजना, लखपती दीदी यांचा प्रामुख्याने समावेश होता.
उमेदमार्फत सुरू झालेल्या तालुका विक्री केंद्राला विनायक महामुनी यांनी भेट दिली. प्रस्तावित विक्री केंद्राच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर किरणापूर येथे भेट देऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जागेची पाहणी केली. चनकापूर, पोटा येथील घरकुल वसाहतीची पाहणी करण्यात आली. चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून सूचना दिल्या. तसेच चनकापूर येथील जि. प. शाळा आणि उडान व संजीवनी उत्पादक गटांच्या सेंटरला भेट देऊन उत्पादित साहित्याची पाहणी केली.