3000 more will be given in Kisan Samman Yojana : किसान सन्मान योजनेत तीन हजार आणखी मिळणार
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यभरातील शेतकऱ्यांना Good News दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आता लवकरच केंद्र आणि राज्याच्या वाट्यात राज्य शासनामार्फत तीन हजारांची भर घातली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षाला १२ ऐवजी १५ हजार रुपये जमा होतील. मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील वनामती येथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली.
सोमवारी पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा १९ वा हप्ता वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर टीका झाली, पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत हेच पैसे कामात येत आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत आम्ही जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली.
PM Kisan Sanman Nidhi : किसान सन्मान निधीचा हप्ता आज मिळणार!
आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉप साठी मदत केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. ॲग्रीस्टॉकमुळे दलाल विरहित शेती पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सधन होत आहे. आता पर्यंत ५४ टक्के शेतकरी यात सहभागी झाले. १०० टक्के शेतकरी यात आणायचे आहेत. शेतकरी उत्पादन खर्च कमी करून बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे..गावातील सोसायटी डिजिटल केली जात आहे.
PM Kisan, Namo Kisan scheme : सरकारी योजनांतून शेतकऱ्यांना वर्षभरात २३२ कोटी
त्यांना १३ घटकांतून आणखी मजबूत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले असून पुढील पाच वर्ष त्यांना वीज बिल येणार नाही. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.