Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अकोला जिल्ह्याला किती फायदा?

82 thousand hectares of area under irrigation by river linking project : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे ८२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली; जिल्ह्यात चार तलावांची निर्मिती

Akola अकोला–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे अकोला जिल्ह्यातील ८२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणानुसार या प्रकल्पांतर्गत चार तालुक्यांतील ४७ गावांमधून मुख्य कालवा जाणार असून, प्रकल्पाची अंमलबजावणी जलदगतीने सुरू आहे.

जिल्ह्यात २५१ एमएम क्युब क्षमतेचे (१ एमएम क्युब = १० कोटी लिटर पाणी) चार मोठे साठवण तलाव तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे ‘बोलबच्चन’

बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात प्रत्येकी दोन तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. बार्शीटाकळी तालुक्यात लोअर काटेपूर्णा (६५ एमएम क्युब), येळवण (३६ एमएम क्युब)चा समावेश आहे. अकोला तालुक्यात शिसा-उदेगाव (७५ एमएम क्युब), चिखलगाव (७५ एमएम क्युब)चा समावेश आहे.

या प्रकल्पासंदर्भात शेतकरी जागर मंचातर्फे संबंधित गावांमध्ये सातत्याने बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रकल्पाविषयी उत्सुकता असून, ते सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतीचे उत्पादन वाढेल, पिण्याच्या पाण्याची सोय होईल, मत्स्य व्यवसायासह इतर पूरक व्यवसायांना चालना मिळेल. औद्योगिक विकासासही चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रकल्पाचे काम पारदर्शक व परिणामकारक होणे आवश्यक असल्याचे मत जागर मंचाने व्यक्त केले.

Crime news : नीट चाचणी परीक्षेत कमी गुण! मुख्याध्यापकान लेकीला बेदम मारून संपवलं

कालव्याचा विस्तार – गावांची संख्या
मुख्य कालवा अकोला, मूर्तिजापूर, पातूर आणि बार्शीटाकळी या चार तालुक्यांतील ४७ गावांमधून जाणार आहे. गावानिहाय तपशील:

मूर्तिजापूर – ८ गावे
बार्शीटाकळी – २२ गावे
अकोला – ४ गावे
पातूर – १३ गावे

सिंचन क्षेत्राचा आढावा

खरीप हंगाम – ४ लाख ३२ हजार हेक्टर
रब्बी हंगाम – १ लाख २७ हजार ७२० हेक्टर
उन्हाळी पिके – ९ हजार २२३ हेक्टर