Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा! घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान!

 

Additional subsidy of 50 thousand to Gharkul beneficiaries : जिल्ह्यातील 19 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ

Nagpur घरकुलासाठी मिळणारे अनुदान कमी असल्याने यातून घरकुलाचे काम पूर्ण करणे हे शक्य होत नाही. यामुळे अनेकांच्या घरकुलाची कामे रखडतात. वेळेत पूर्ण होत नाहीत. परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही. याचा विचार करता घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

याचा लाभ जिल्ह्यातील १९ हजार लाभार्थ्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनंतर ही पावले उचलण्यात आली आहेत.
नागपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देण्यात आलेल्या २०,२२५ उद्दिष्टापैकी १९,०८५ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी Good News!

यातील १२,८६२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे १९ कोटी २९ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना एक लाख २० हजार रुपयांचे दिले जाते. मिळणारे अनुदान कमी असल्याने याबाबत लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणीदेखील करण्यात येत होती. राज्यामध्ये २० लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून घरकुलाचा पहिला हप्ता वितरण करण्यात आला आहे. परंतु हे सर्व होत असताना घरकुलांसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळेच ‘ वाघनखं ‘ भारतात !

 

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात ५० हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील १९ हजार लाभार्थ्यांना मिळणार आहे. यातील १२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्याला दिलेले २० हजार २२५ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण होईल. अशी माहिती जि.प.चे सीईओ विनायक महामुनी यांनी दिली आहे.