Ahead of Chief Minister’s visit, the medical hostel was hidden in a curtain : मेडिकलमधील दुरवस्था चव्हाट्यावर
Nagpur मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दुरावस्था ऐन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याअगोदर समोर आल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे (डॉक्टर) निवासस्थान नवीन पीजी वसतिगृह राहण्यालायकदेखील नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क वसतीगृहच पडद्याआड लपविले. मुख्यमंत्री या कारभारावर आसूड ओढणार का, याकडे डॉक्टरांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मेडिकलमधील रेसिडेन्ट डॉक्टर्सच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. तेथे तुटलेल्या खिडक्या, मातीचे ढिगारे, दुर्गंधी असेच चित्र दिसून येत आहे. मेडिकलच्या देखभालीसाठी बांधकाम विभागाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. आवश्यकतेनुसारही निधी दिला जातो. मात्र, असे असतानाही नवीन पीजी मेडिकल वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून त्याची स्वच्छताही झालेली नाही, असे म्हणता येईल. देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने विभागाची भूमिका संशयास्पद आहे.
Sarpanch of Siregaonbandh special guest in Delhi : सिरेगावबांधच्या सरपंच दिल्लीत प्रमुख पाहुण्या
हे वसतिगृह राहण्यायोग्य नसल्याचे मेडिकलच्या अधिष्ठात्यांनीदेखील मान्य केले. या स्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शनिवारचा दौरा ठरला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. ट्रॉमा सेंटर ते डीन कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील सुरू असलेल्या बांधकामाच्या जागेच्या आसपासचा रस्ताही मोकळा करण्यात आला. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले.
PM Narendra Modi : चक्क पंतप्रधानांच्या कार्यक्रमात चालढकल !
मेडिकलच्या बांधकाम विभागाला दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये मिळतात. असे असतानाही वर्षानुवर्षे पीजी वसतिगृहाची अवस्था दयनीय आहे. लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनाच आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. यातून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक विजय चुटेले यांनी केला आहे. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालून मेडिकलचा कायापालट करावा अशी मागणी समोर येत आहे.