CM Devendra Fadnavis : नागपूर पोलिसांना झोप कशी लागते?

Nagpur

Burglaries increased in the home minister’s city : गृहमंत्र्याच्या शहरात वाढल्या वाहन चोऱ्या आणि घरफोड्या

Nagpur तहसील पोलिसांनी रुग्णालय परिसरातून वाहन चोरी Theft करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड केला. चार आरोपींना अटक करून 40 वाहनांसह 13 लाख रुपयांचा माल जप्त केला. आरोपींनी नागपूरच नाहीतर वेगवेगळ्या राज्यांच्या शहरांमध्ये रुग्णालय परिसरातून वाहन चोरी केले होते. विशेष म्हणजे एवढ्या घटना रात्री-बेरात्री सुरू आहेत. नागपूर हे गृहमंत्र्यांचे शहर आहे. तरीही पोलिसांना Police झोप कशी लागते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेयो रुग्णालयाच्या पार्किंगमधून वाहन चोरीच्या Vehicle Theft घटना वाढल्या होत्या. या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या दरम्यान छिंदवाडाच्या अमरवाड ठाण्याच्या पोलिसांनी तहसील पोलिसांशी संपर्क साधला. रोहित चंद्रपुरी आणि नीरज नागवंशी यांना वाहन चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. चौकशीत त्यांनी मेयो रुग्णालयाच्या पार्किंगमधून तीन वाहन चोरी केल्याची कबुली दिली. मात्र, न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली असल्याची माहिती दिली.

या माहितीवरून तहसील पोलिसांनी दोन वर्षांमध्ये मेयो रुग्णालयाच्या पार्किंगमधून वाहन चोरी झाल्याच्या सर्व तक्रारींचा सखोल तपास सुरू केला. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे दोन्ही आरोपींचा सुगावा लागला. तत्काळ एक पथक छिंदवाडासाठी रवाना झाले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी नागले, कुमरे आणि अहेके यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली.

‘नंबर प्लेट’ बदलून मध्यप्रदेशात विक्री

ही टोळी गेल्या २ वर्षांपासून मेयो आणि आसपासच्या भागात सक्रिय होती. विशिष्ट्य परिसरातून वाहन चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटली. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे आरोपी बाहेर राज्यातील असल्याचा संशय पोलिसांना होता. आरोपी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची मोटारसायकल चोरी करायचे. नंतर त्या वाहनांची ‘नंबर प्लेट’ बदलून मध्यप्रदेशातील ग्रामीण भागात त्यांची विक्री करायचे.

40 मोटारसायकल जप्त
चोरीच्या गाड्या विकून मिळालेल्या पैशांवर आरोपींची मौजमज्जा सुरू होती. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 40 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. तपासात आरोपींनी तहसील पोलिस ठाण्यांतर्गत 7, मानकापूर हद्दितून 4, सीताबर्डीतून 2, कोराडी आणि धंतोली येथून एक-एक वाहन चोरी केल्याचे समोर आले. यासोबतच आरोपींनी छिंदवाडा, भोपाळ, सतनापूर आदी ठिकाणाहूनही वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले.