Chief Minister will lay the foundation stone for development works worth three thousand crores : फडणवीस ११ जूनला अकोल्यात; क्रिकेट क्लब मैदानावर जनसंवाद मेळावा
Akola राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे ११ जून रोजी अकोला दौऱ्यावर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिकेट क्लब मैदानावर भव्य जनता-कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीला भारतीय जनता पक्षाने युद्धपातळीवर सुरुवात केली असून, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघातील विविध योजनांचे लोकार्पण, भूमिपूजन व जनतेशी थेट संवाद साधण्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १ वाजता क्रिकेट क्लब मैदानावरील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
CM Devendra Fadnavis : झुडपी जंगलांबाबतचा निर्णय ऐतिहासिक, विकासाला चालना मिळेल
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
CM Devendra Fadnavis : निवडणुका आल्या, जनता दरबारात गर्दी वाढली!
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव मानकर, संजय गोटफोडे, अॅड. देवाशीष काकड, गिरीश जोशी, राधा तिवारी, डॉ. अमित कावरे, अंबादास उमाळे, संकेत राठोड, नितीन लांडे, संतोष शिवरकर आदींसह सुमारे 2000 कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.
कार्यक्रमादरम्यान महायुती सरकारच्या यशस्वी कारभाराची माहिती, ‘ऑपरेशन शेंदूर’ संदर्भातील आगामी योजना, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची कार्यप्रगती जनतेपुढे मांडली जाणार आहे.








